"स्वच्छ पोलीस वसाहत" स्पर्धेकरिता कावेरीनगर सज्ज
पिंपरी ( सह्याद्री बुलेटीन ) - पोलीस वसाहतींसाठी राबविण्यात येणाऱ्या "स्वच्छ पोलीस वसाहत" स्पर्धेकरिता वाकड येथील "कावेरीनगर पोलीस वसाहत" सज्ज झाली असून "युवक मित्र मंडळाने" यासाठी नियोजन सुरू केले आहे.
मंडळाचे अध्यक्ष निखिल कदम यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या बिल्डिंगचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे अवाहन केलेले आहे व यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपआपल्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे.
ही प्रक्रिया राबविताना स्वतःची बिल्डिंग स्वच्छ कशी राहील, त्याकरिता काय उपाययोजना कराव्या लागतील, हिं जबाबदरी घेऊन मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे.
ज्याठिकाणी मोठे काम असेल किंवा मोठी मदत लागेल अशा ठिकाणी मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून सर्वजण मिळून हे काम करीत आहेत. याकरिता पुढील १० दिवसाची रूपरेषा ठरविण्यात आलेली आहे.
कावेरीनगर पोलीस युवक मित्र मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसाचा १ तास या मोहिमेसाठी देणार आहे. त्यामुळे कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये एक चैतन्याचे वातावरण तयार झालेले आहे. मुलांची ही धडपड पाहून यामध्ये येथील नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
यावेळी कावेरीनगर पोलीस युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल कदम म्हटले की "गेली २६ वर्षे आम्ही याठिकाणी गणेशोत्सव, नवरात्र व इतर माध्यमातून स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, अन्नदान, मोफत वैद्यकीय तपासणी इ. सामाजिक उपक्रम घेत असतो. पोलीस आयुक्त यांनी पहिल्यांदाच सर्व पोलीस वसाहतींसाठी ह्या स्पर्धेचा उपक्रम राबविला आहे.
यामुळे "आमची पोलीस वसाहत ही शहरात अव्वल ठरेल व या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळवेल" असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.